श्री गुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी संस्थान

ग्रामगीताप्रणित ग्रामनिर्माण ते राष्ट्रनिर्माण

संत महापुरुषांच्या शुद्ध- सात्विक अध्यात्मिक अधिष्ठानावरून स्वावलंबन, स्वयंशासन व स्वयंपूर्णता तत्त्वावर आधारित शोषणरहित, शासनरहित, समाजवादी समाजव्यवस्था (ग्रामस्वराज्य) निर्माण करणारा हा ग्रामगीताप्रणित भू वैकुंठ प्रयोग आहे.

ग्रामगीतेचे रचयिता व अड्याळ टेकडी चे प्रेरणास्रोत

ब्रह्मलीन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

(जन्म : ३० एप्रिल १९०९,
निर्वाण : ११ ऑक्टोबर १९६८)

ग्रामस्वराज्याचे प्रणेते व अड्याळ टेकडी चे संस्थापक

कर्मयोगी संत प. पू. तुकारामजीदादा गीताचार्य

(जन्म : गीताजयंती ९ डिसेंबर १९१४,
महासमाधी : ज्येष्ठ शुक्ल द्वादशी शके १९२८
गुरुवार ८ जून २००६)


ध्येय व उद्दिष्टे

  • भू वैकुंठ अड्याळ टेकडी हे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि कर्मयोगी संत पू तुकारामदादा गीताचार्य यांच्या १२ वर्षाच्या मौन साधनेने पावन झालेले पवित्र तपोवन स्थळ आहे.
  • ग्रामगीताप्रणित गुरुदेव सेवा मंडळ तत्त्वज्ञान, ग्रामगीतेचे प्रात्यक्षिक प्रयोग व संत विचारांच्या मानवतावादी संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी अड्याळ टेकडी हे संस्थान सातत्याने कार्य करीत आहे.

सर्वधर्मसमन्वय

गाव समाजातील जात – धर्म, पंथ – पक्ष, गरीब – श्रीमंत, उच – निचता इत्यादी सर्व भेद नष्ट करून सर्वांचा समन्वय साधणे.

स्वावलंबन (ग्रामोद्योग)

गावकऱ्यांचे श्रम व गावातील नैसर्गिक संसाधनाद्वारे स्वावलंबी व आत्मनिर्भर गाव निर्माण करणे.

स्वयंशासन (ग्रामसभा)

गावामध्ये सेवा, संघटन, ग्रामसभा, ग्राम संरक्षण दल, पंचायत राज, न्यायमंडळ इत्यादी द्वारे स्वयंशासित समाज म्हणजे स्वराज निर्माण करणे.

स्वयंपूर्णता (अध्यात्म)

सेवा व साधना याद्वारे मनुष्य जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष प्राप्त करणे.

गुरुकुल

ग्राम आरोग्य, जीवन शिक्षण, संस्कार, व्यावहारिक ज्ञान, ग्रामनिर्माण कला व ग्रामरचनेचे प्रशिक्षण देणे.

लोकजागृती

या विचारांचा व कार्याचा विस्तार होण्यासाठी विविध सभा, सम्मेलन, कार्यक्रम, शिबिर, यात्रा, उत्सव, भजन, कीर्तन, प्रबोधन, नाटक, भारूड, कला पथक यांचे आयोजन करणे.

लोकसहभाग

सरकारी किंवा निजी रजिस्ट्रेशन, ग्रँट, ट्रस्ट, फंड इत्यादीपासून सर्वथा मुक्त व केवळ श्रमदान, लोकसहयोग आधारित कार्य करणे.

प्रकाशने

ग्रामगीता तत्त्वज्ञानावर आधारित पुस्तके, पत्रके, आणि विविध प्रशिक्षण साहित्य. मूळ ग्रंथातील विचारांचे आधुनिक संदर्भात अर्थ समजावून सांगणारी पुस्तके.

अध्यात्म, सेवा व समर्पण यांचा त्रिवेणी संगम

अध्यात्म केंद्र अड्याळ टेकडी हे ठिकाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पू तुकारामदादा गीताचार्य यांच्या मौन साधनेसाठी आणि जनजागृतीसाठी निवडलेले एक पवित्र स्थळ आहे.

राष्ट्रसंतांनी समाजाचे उत्थान करणारा “ग्रामगीता” हा महान ग्रंथ लिहिला आणि त्याचे प्रायोगिक स्तरावर प्रात्यक्षिक करण्यासाठी म्हणून पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांच्या द्वारे या भू वैकुंठ अड्याळ टेकडी अध्यात्म केंद्राची निर्मिती केली.